Saturday, June 21, 2008

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?
वाटतं नशीब करतंय आपलंच हसं॥

नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस

नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू
क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू

लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट
एरवी वेळेवर धावलात तरी चुकते तिची भेट

विकेंडला जोडून कामवाली मारते दांड्या
आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या

रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला
पंक्चरायला तुमचंच चाक पडलेल्या काट्याला

निवांत येऊन टीव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते
देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते

'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता॥
रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता

मग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरून कामं करता
'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करून वाचता॥

'सालं नशीबच कंडम' म्हणून पुन्हा पुन्हा रडता
साध्या साध्या कामात शंकाकुशंकाना ओढता

पण गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

आपल्या आयुष्याची स्टोरी आपण जगत जायाची

प्रेमात कधी पडू नकोस

ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप,
प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला शाप...
गुप्ततेचे ओझे मनावर, मानगुटीवर तिचा बाप...

प्रेम अग्नी, प्रेम युद्ध,
प्रेम म्हणजे वेडेपणा शुद्ध...
मागावर तुझ्या नेहमी, भाऊ तिचा निर्बुद्ध...

प्रेम म्हणजे विरह,
प्रेम म्हणजे भ्रमवारा...
मित्रांशी संबंध तुटणार, मैत्रीपासुन दुरावा...

प्रेम म्हणजे दिवास्वप्ने,
प्रेम म्हणजे जागरण...
आपल्या आवडी-निवडीवर बदलाचे आक्रमण...

प्रेम म्हणजे बंधन,
प्रेम म्हणजे पाश...
पैशांचा होतो खुर्दा, अन वेळेचाही नाश...

म्हणुन सांगतो मित्रा,
प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

बायको म्हणजे

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते

ती जेंव्हा घरात असते, माझं तिच्याशी अजिबात पटत नाही,
ती जेंव्हा घरात नसते, मला जरासुद्धा करमत नाही
पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला,
नाठाळ शेजा-याला तीच व्यवस्थित हाताळू शकते

घरात कुणाची, कुठली वस्तू कुठे आहे?
बँकबुक, लौकरच्या चाव्या, हातरुमाल कुठे आहे?
कुणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधी आहे?
सारी नोंद तिच्या मेंदुत पक्की असते

आला गेला पै पाहुणा,
सर्वांचच ती मनापासुन स्वागत करीत असते
कोण आचरट, कोण हावरट, कोण बावळट, कोण भला
प्रत्येकाची नवी ओळख तीच करुन देत असते

मुलाचा अभ्यास, ग्रुहपाठ, पालकसभा,
तीच अटेंड करत असते
विविध कर्जे, कशा कशाचे हप्ते, सणवार, लग्नकार्य, देणी-घेणी
अनेक आघाड्यांवर एकाचेवेळी तीच लढत असते

सासु-सासरे, आई-वडील, दीर, जाऊ, नणंदा आणि वहिनी
सर्वांबरोबर समभावाने ती वागत असते
सर्वांशी गोड बोलुन चांगुलपणा मी घेतो,
नको तिथे, नको तेवढं खरं बोलुन वाईटपणा ती घेत असते

वाहन मी चालवत असतो,
शेजारी ती बसलेली असते,
घ्या डावीकडे, ग्या उजवीकडे,
सतत मला ती सांगत असते

म्हैस आली संभाळा,
त्या बाईकडे काय बघत बसलात,
टाका गिअर, व्हा पुढे,
सतत सुचना देत असते

घराच्या दारावर नेम्प्लेट माझी असते,
पण घराच्या आत तिचीच
अनिर्बंध सत्ता असते
तिच्याच इशा-यावर अवघे घरदार नाच असते,

फुटकं माझं नशिब,
चांगली स्थळे सोडुन तुमच्या घरी आले,
केवळ मी म्हणुन सोसलं सारं,
आजवर इथं टिकुन राहिले,
तुमची काय, माझी काय,
प्रत्येकाची बायको हेच म्हणत असते

खरं सांगतो मित्रा,
बायको म्हणजे , वळलं तर सुत
नाहीतर मानगुटीवर बसलेलं भुत असते
साहेब काय, कारकुन काय, सगळ्यांची गत तीच असते

कुठल्याशा औफिसातल्या कुठल्याशा कोप-यात
खर्डेघाशी मी करत असतो
पण आपला नवरा मोठा साहेब आहे
असं जगाला सांगुन ती माझी अब्रू झाकीत असते

दोन्ही हातांनी मी माझेच पैसे उधळत असतो
ती मात्र काटेकोरपणे हिशेब सगळा ठेवीत असते
महिना अखेरी पेट्रोलसाठी मी जेंव्हा रददी विकायला काढतो,
तेंव्हा शंभराची नोट हळुच ती माझ्या हातावर ठेवीत असते

वरवर राग असला तरी मनात तिच्या
रातराणीसारखी दडलेली एक प्रित असते
मी जेंव्हा कविता रचत असतो,
तेंव्हा ती कविता जगत असते

कधी श्रावणसरींसारखी ती प्रसन्नपणे बरसत असते
तर कधी ग्रीष्मातल्या उन्हासारखी प्रछन्नपणे तळपत असते
तिचं बरसणं काय, तिचं तळपणं काय
सर्वांच्या सुखासाठी ती हे सारं करीत असते

घरातील प्रत्येक व्यक्ती मजेत
आणि आनंदात जगत असते
कारण अवघ्या घरादारासाठी
ती कणाकणाने झिजत असते

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
कधी समईत तेवणारी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते

मैत्री

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा

स्वाभीमान
मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुखदू:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वादया ची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवन
मैत्री म्हणजे आयुश्यातील न सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हणजे राग
मैत्री म्हणजे आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग

Monday, June 16, 2008

मराठी प्रिय वाचक

ज्यांना मराठी बद्दल सार्थ अभिमान आहे त्यांनी जरूर सम्पर्क करावा .